Liquor Policy : मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता फक्त ९९ रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?

Liquor Policy : सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे हैराण झालेल्या मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.१८) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये राज्याच्या नवीन दारू धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर लोकांना त्यांचा आवडता ब्रँड फक्त ९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.
नवीन नियम पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. नव्या धोरणात राज्यसरकारने सर्व ब्रँडच्या दारूच्या किमती कमी केल्या आहेत. नवीन नियम लागू झाल्यानंतर आंध्रप्रदेशातील लोक कोणत्याही ब्रँडची दारू फक्त ९९ रुपयांना विकत घेऊ शकतील. Liquor Policy

आंध्र प्रदेश सरकारचे नवीन धोरण लागू झाल्यानंतर, ग्राहक कोणत्याही प्रस्थापित ब्रँडचा १८० मिली पॅक केवळ ९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतील. आंध्र प्रदेश सरकारने नवीन मद्य धोरण तयार करताना गुणवत्ता, प्रमाण आणि परवडणारीता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.