Ashwini Jagtap : अश्विनी जगताप हातात तुतारी घेण्याची चर्चा, अखेर दिले स्पष्टीकरण, म्हणाल्या, दीराला उमेदवारी मिळाली तर मी….

Ashwini Jagtap : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच चिंचवड विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
कारण त्यांच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी फुंकण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. तर याबाबत भाजप आमदार अश्विनी जगताप यांना स्पष्टीकरण दिले आहे.
चिंचवडमधील भाजपच्या आमदार अश्विनी जगताप तुतारी फुंकणार, या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. विरोधकांनी हे घडवून आणलेलं षडयंत्र आहे. असा दावा करत मी भाजपकडूनच चिंचवड विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचे अश्विनी जगतापांनी ठामपणे सांगितले आहे.
माझे दिर शंकर जगताप आणि माझ्यात कोणते ही वाद नाहीत. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर मी त्यांचा प्रचार करत त्यांना निवडून आणेन. असा विश्वास देखील अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला आहे. Ashwini Jagtap
भाजप आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, या चर्चा सुरू आहेत, त्यामध्ये काहीह तथ्य नाही. कोणीतरी या चर्चा सुरू केल्या आणि बाकी विरोधक या चर्चांना खत-पाणी खालत आहेत. लक्ष्मण जगताप यांनी आजारी असताना, ऑक्सीजन लावून ते मतदानासाठी उपस्थित राहिले होते.
त्यांनी ज्या पक्षाची निष्ठा राखली, ती निष्ठा आम्ही कोणीच मोडणार नाही, लक्ष्मण जगताप यांच्यानंतर पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, पक्षाने संधी दिली त्यामुळे मी पक्षाला सोडणार नाही, असेही अश्विनी जगताप यांनी म्हंटले आहे.