दुःखद ! इंदापूरमध्ये वीज पडून तरुणांचा मृत्यू, पोलीस होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण….! 


इंदापूर : इंदापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वीज कोसळून काटी गावातील भरतवाडी येथील एका २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ओंकार दादाराम मोहिते असे या तरुणाचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

तो आपल्या शेतामध्ये कामानिमित्त गेला होता. रात्री उशीरा वीज कोसळली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात इंदापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वीज पडल्यानंतर इंदापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी त्याला दाखल करण्यात आले होते.

यावेळी डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्यापासून जवळच अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील एका नारळाच्या झाडावर देखील वीज पडली असून ते झाड जळाले आहे. दादाराम महादेव मोहिते यांना ओंकार हा एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

दरम्यान, ओंकार हा पोलीस भरतीची तयारी करत होता. शांत, संयमी आणि हुशार मुलगा असल्याने त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!