Pune Crime : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, तरुणाचा गळा चिरून खून, घटनेने पुण्यात खळबळ…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बावधन पोलीस चौकीजवळील एका नर्सरीमध्ये मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

प्रवीण महतो (वय २५, रा. बावधन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीवकुमार महतो याला त्याच्या पत्नीबरोबर प्रवीण महतो यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. काल रात्री प्रविण महतो हा झोपला असताना राजीवकुमार महतो याने साथीदाराच्या मदतीने प्रवीण याचा गळा चिरुन खून केला. Pune Crime

या घटनेची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन राजीवकुमार महतो व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!