Ganesh Visarjan : गणपती विसर्जनादरम्यान अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू…

Ganesh Visarjan : गणपती विसर्जना दरम्यान दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातुन ही घटना समोर आहे. काल सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव इथं ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजिंक्य नवले आणि केतन शिंदे अशी मृत युवकांची नावे आहेत.
घरगुती गणपती विसर्जन करत असताना पाय घसरुन तलावात पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिक आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. Ganesh Visarjan

दरम्यान, गणपती विसर्जनादरम्यान अनेक ठिकाणी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
Views:
[jp_post_view]