Ajit Pawar : ….ही इच्छा पूर्ण व्हावी!! अजितदादांसाठी पत्नी सुनेत्रा पवारांचं गणरायाकडं साकडं, नेमकं साकडं काय?


Ajit Pawar : आज सकाळी पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणरायाची पुजा केली. देवाकडे साकडं घातलं. राज्यासह पुण्यातील नागरिकांना शांततेत आणि आपली जबाबदारी पार पाडत विसर्जनात सहभागी होण्याचं आवाहन केलं.

यावेळी त्यांच्यासोबत खासदास सुनेत्रा पवार या देखील होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाप्पाकडे काय मागितलं यावर उत्तर देताना सांगितलं की, आज अंनत चतुर्दशी आहे, आज सकाळी उत्साहपुर्ण वातावरात कार्यक्रम पार पडला. जनतेच्या सर्व इच्छा पुर्ण होऊ देत, राज्यातील नागरिकांना सुखी, समृध्दी, आणि भरभराटी लाभो, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, तुम्ही गणरायाकडं अजितदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून साकडं घातलं का? या प्रश्वावर उत्तर देताना खासदार सुनेत्रा पवार म्हणाल्या, सकाळी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते, त्यांचा नेता मोठा व्हावा, आपल्या नेत्याला मोठं पद मिळावं, प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटतं, त्यात कार्यकर्त्यांचं अजित पवारांवर खूप प्रेम आहे, कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा पुर्ण होवो, असे साकडं मी गणरायाच्या चरणी साकडे घातले आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हंटले आहे. Ajit Pawar

प्रत्येक पक्षाला वाटते असते आपला पक्ष निवडणून आला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो. त्यामुळे मलाही वाटते महायुतीचे सरकार येणार त्याचबरोबर ज्याचं संख्याबळ जास्त असेल त्या पक्षांचा मुख्यमंत्री असेल असंही बोलताना सुनेत्रा पवार यांनी म्हंटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!