Rahul Kul : भीमा पाटस कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचा एल्गार, राहुल कुल यांना १० हजार मतांनी पाडणार, कामगारांच्या बैठकीत ठरलं..!!
Rahul Kul : दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी सध्या आंदोलन सुरू केले आहे. 40 वर्षे घाम गाळून सुध्दा आमचे पैसे दिले नाहीत, यामुळे येणाऱ्या निवडणूकीत राहुल कुल यांना 10 हजार मतांनी पाडणार असा इशारा कामगारांनी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांना दिला आहे.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या निवडणुकीत राहुल कुल 700 मतांनी निवडून आले आहेत. मात्र आम्ही कामगारांनी मदत नाही केली तर 10 हजार मतांनी पराभव करू असा इशाराच त्यांनी दिला आहे.
दरम्यान, आमचा तळतळाट तुम्हाला लागेल येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला विरोध करू, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आमचे सेवक आहात, यामुळे लवकरात लवकर आमचे पैसे द्या, असेही कामगारांनी म्हटले आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न वाढण्याची शक्यता आहे. Rahul Kul
अनेक कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र त्यांचे पैसे मिळाले नाहीत. यामुळे हे पैसे मिळणार तरी कधी असा प्रश्न त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांना विचारला आहे. यावर राहुल कुल नेमकं काय भूमिका घेणार हे लवकरच समजेल.