Rain Update : राज्यात पुन्हा धो-धो बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट, जाणुन घ्या हवामान विभागाचा अंदाज…

Rain Update : राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र आहे. अशातच आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज कोकणासह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात देखील घाट माथा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, नागरिकांना या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Rain Update


मराठवाड्यात देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांची कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह उपनगरातही आज पावसाची शक्यता आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.