Amol Kolhe : स्वार्थासाठी बाप बदलला, आता वाघाच्या आवाजाचा म्याव झाला..!!खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना बारामतीतच धुतलं…


Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना चांगलेच टोले लगावले आहेत. एक कविता सादर करुन त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

बारामतीत शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान अमोल कोल्हे बोलत होते. त्यांनी एक चारोळी म्हटली, ती अशी होती, किती दमदाटी केली, तरी लोक आता बधत नाही. बघतो तुला, बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. वस्तु चोरली, रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला, तर जनतेला ते पटत नाही.

कोल्हे म्हणाले, स्वार्थासाठी बाप बदलला तर काय होते हे बारामतीकरांनी लोकसभेला दाखवून दिले आहे. आता विधानसभेची वेळ आहे. त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातच नव्हे, तर देशातही सरकार बदलणार आहे. Amol Kolhe

त्यामुळे लोकसभेसारखेच काम आपल्याला विधानसभेतही करायचे आहे. आम्हाला कायम आवाजाचा दरारा राखण्याची सवय होती. पण या वाघाच्या आवाजाचं आता म्याऊ म्याऊ झालय की काय कळेना झाले, अशी टीका अजित पवारांवर कोल्हे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!