Baramati : मांजा यावर्षीही ठरला जीवघेणा!! बारामतीत मांजाने कापला गळा, भयंकर घटना आली समोर…


Baramati : बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी चायनीज मांज्यामुळे एकाचा गळा कापल्याची घटना घडली आहे. या मांज्यावर बंदी असताना देखील मांजा उडवण्याचा प्रमाण काही कमी होत नाही. यामुळे कारवाईची मागणी होत आहे.

गेल्यावर्षी पोलीसांनी यावर मोठी कारवाई केल्याचे दाखवले. यावर्षी पुन्हा देखील मांजाचे भूत जागे झाले. आज तर बारामतीत एका बांधकाम व्यवसायकाचा गळाच या मांजाने कापला गेला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या जखमी झालेल्या व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत.

अनिल मोहन कायगुडे हे बारामती शहरातील बांधकाम व्यवसायिक आहेत. आज ते मएसो शाळेपासून एमआयडीसीतील त्यांच्या घरी निघाले होते, असे असताना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या या शाळेजवळ रस्त्याच्या आडवा अडकलेला मांजा त्यांना दिसलाच नाही, यामध्ये मांजा गळ्याला लागून त्यांचा गळा कापला आहे.

दुचाकीवरील कायगुडे यांच्या गळ्याला माझ्या चिरला. याने कायगुडे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लगेच उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे. यामुळे पुन्हा एकदा मांजा खरोखरच शहरातून हद्दपार झाला आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Baramati

दुकानदारांवर जुजबी कारवाई करण्यात आल्याने काही होणार नाही. या दुकानदारांवर अत्यंत कठोर कारवाईची आवश्यकता आहे. ज्या दुकानदारांना व्यवसायात विकत असलेली वस्तू विषारी आहे याचे काहीच देणे घेणे नाही, यामुळे सगळेच हा मांजा विकतात.

याबाबत कारवाई कठोर होत नसल्यानेच अशा दुकानदारांचे फावत असल्याचे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. असा मांजा जर कुठे व्यावसायिकाकडे आढळला, तर कायद्यातील कलमांच्या तरतुदीचा योग्य तो वापर करून तो खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशीच मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!