Shirur : सासऱ्याचा सुनेसोबत झाला वाद, सुनेने भावांना सोबत घेऊन विषयच मिटवला, धक्कादायक घटनेने शिरूर हादरले…

Shirur : एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते या वादानंतर सुनेचे दोन भाऊ व एक बहीण सदर ठिकाणी आले त्यांनी सासऱ्याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शिरूर येथून समोर आली आहे.

वसंत दिलीप भोसले (वय ४३., रा. पाण्याच्या टाकीजवळ शिरुर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकणी नागरेश बाजीराव काळे, राजेश बाजीराव काळे, निघु बाजीराव काळे यांच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की गुरुवार (ता.१) रोजी दुपारी २ च्या सुमारास शिरुर येथील होलमिल बेकरी जवळच्या डांबरी रोडवर वसंत दिलीप भोसले त्यांची सुन अंजली रुवल काळे हिच्या सोबत प्रापंचिक वाद झाले होते.

या वादाच्या कारणावरुन सुनेचे दोन भाऊ नागरेष बाजीराव काळे राजेश बाजीराव काळे व एक बहीण निघु बाजीराव काळे यांनी कोयत्याच्या उलट्या बोथट बाजूने वसंत भोसले यांच्या छातीत, पायावर मारुन डांबरी रोडने फरपटत नेऊन जबर मारहाण केली होती. त्या जबर मारहाणीत वसंत भोसले यांचा समोवारी (ता.५) रोजी मृत्यू झाला. Shirur
दरम्यान, या खून प्रकरणी नागरेश बाजीराव काळे, राजेश बाजीराव काळे, निघु बाजीराव काळे यांच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले हे करत आहेत.