मुकेश अंबानींच्या रिलायन्समध्ये ४२ हजार जणांना डच्चू, २१ लाख कोटींची कंपनी तोट्यात?

मुंबई : देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करण्यात आली आहे. रिलायन्सने ४२००० लोकांना कामावरून काढून टाकले आहे. अंबानींच्या कंपनीची गणना देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये केली जाते.

त्यांची कंपनी २१ लाख कोटी रुपयांची उलाढाल करणारी देशातील पहिली कंपनी ठरली आहे. देशातील दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात खर्चात कपात केली. कंपनीने आपल्या वार्षिक सर्वसाधारण अहवालात मनुष्यबळ कमी करण्याची घोषणा केली आहे.
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ३,८९,००० होती, ती २०२४ मध्ये ३,४७००० वर आली आहे. रिलायन्स रिटेलमध्ये रिलायन्स समूहानं खर्चात सर्वाधिक कपात केली. आरआयएलच्या ताज्या वार्षिक रिपोर्टनुसार, नवीन नोकरभरतीची संख्या एक तृतीयांशने कमी करून १,७०,००० करण्यात आली आहे.

समूहाच्या कामगार कपातीचा मोठा भाग त्यांच्या रिटेल व्यवसायात होता, जो आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आरआयएलच्या २,०७,००० कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या सुमारे ६० टक्के होता. ही संख्या आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २,४५,००० होती. जिओने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कर्मचा-यांची संख्या ९५,००० वरून ९०,००० पर्यंत कमी केली आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांच्या खर्चात ३ टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि ती वाढून २५,६९९ कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच कंपनीवर इतक्या खर्चाच अतिरिक्त भार आला आहे.