Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणी वडिलांना मोठा धक्का! दिलीप खेडकरांच्या अडचणीत वाढ, नेमकं काय घडलं?


Pooja Khedkar : गल्लीपासून दिल्लीपर्यत चर्चेत आलेल्या पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेतच. मात्र आता तिचे वडिल दिलीप खेडकरांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाता आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पूजा खेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे यासाठी दबाव आणल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्या वडिलांवर आहे. आता या प्रकरणात दिलीप खेडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Pooja Khedkar

या प्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात अर्ज दिला असून, पोलिसांकडून अर्जाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी देखील एका प्रकरणात पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

शेतकऱ्यांना धमकी दिल्याचा पूजा खेडकर यांच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!