Pune Zika Virus : पुणे शहरात झिका व्हायरचे एकूण ६६ रुग्ण, २६ गर्भवती महिलांना व्हायरसची लागण, धक्कादायक माहिती आली समोर…


Pune Zika Virus : पुण्यात झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून रुग्णसंख्या ६६ वरती पोहोचली आहे. यामुळे पुणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांच्या मृत्यूंचे परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेला मुसळधार पाऊस, घाण आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका वाढल्याचे दिसून येत आहे.

पुणे शहरात झिका विषाणूचे एकूण ६६ रुग्ण झाल्याने पुणेकरांसह आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. यामध्ये 26 गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली आहे. झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका हा गर्भवती महिला, लहान मुले आणि वृध्दांना आहे.

दरम्यान, झिकाची लागण झालेल्या आणि संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात खबरदारी घेतली जात आहे.

झिका विषाणू संक्रमित एडिस डासाच्या चाव्याव्दारे प्रसारित होतो, जो डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या संसर्ग प्रसारित करण्यासाठी ओळखला जातो. ताप, पुरळ, अंगदुखी आणि सांधेदुखी यांचा समावेश होतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!