महसूल व वन विभागाने अखेर उपजिल्हाधिकारी, तहसिलदार ,नायब तहसिलदार बदल्यांना काढला मार्ग ! हवेलीच्या प्रांत म्हणून यशवंत माने तर जुन्नर तहसिलदारपदी सुनिल शेळकेंची नियुक्ती

जयदिप जाधव उरुळीकांचन : महाराष्ट्र महसूल व वन विभागच्या वतीने राज्यातील उपजिल्हाधिकारी , तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच तलाठी संवर्गातील अस्थापनांचे बदलीचे आदेश शनिवार ( दि.३ ) रोजी काढण्यात आले असून त्यानुसार उपजिल्हाधिकारीपुणे जिल्ह्यात मुदत संपलेल्या व मुदतपूर्व बदलीसाठी प्रतिक्षेत असलेल्या हवेली उपविभागीय महसूल अधिकारी (प्रांत) , जुन्नर, भोर , इंदापूर या तालुक्यांच्या तहसीलदार पदाच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार हवेलीच्या प्रांतअधिकारी म्हणून स्थावर व्यवस्थापक , शेती महामंडळ गंगापूर मळा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून यशवंत माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हवेलीच्या प्रांतअधिकारी संजय आसवले यांची भूसंपादन अधिकारी क्र.९ , सातारा या ठिकाणी बदली झाली आहे.
महसूल व वन विभागाच्या वतीने राज्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच नायब तहसीलदार यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या तरतुदी व महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे बदल्यांचे नियोजन विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ कलम ४(४) , ४(५) नुसार बदलल्यांसाठी पात्र करण्यात आले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक कामकाजात निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकारी बदल्यांत त्या पदाचा कार्यभार नियुक्त झालेला अधिकारी घेत नाही तोपर्यंत नियुक्त झालेल्या अधिकारी यांना पदभार देऊ नये असा आदेश कक्ष अधिकारी प्रशांत सपकळ यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार २० ऑगस्ट या प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यापूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करु नये अशा सूचनेपूर्वी पदस्थापना करुन बदल्यांना मंजुरी दिली आहे. तसेच राज्यातील तलाठी संवर्गातील तलाठ्यांच्या बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना निवासी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.त्यानुसार पुणे जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी संवर्गातील हवेलीउपविभागीय महसूल अधिकारी म्हणून यशवंत माने यांची नियुक्ती झाली आहे. तर जुन्नर तहसीलदार म्हणून वनमंत्री यांचे कार्यकारी अधिकारी सुनिल शेळके यांची बदली झाली आहे.
रविंद्र सबनीस यांची अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय बदली झाली आहे. इंदापूर चे तहसिलला श्रीकांत पाटील यांची बदली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जीवन बनसोडे , सांगली तहसीलदार यांची बदली करण्यात आली आहे.भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांची सांगली वळवा येथे बदली झाली आहे . तसेच पुनर्वसन तहसिलदार पुणे विभागीय कार्यालयातून दशरथ काळे यांची रायगड जिल्ह्यात माण तालुक्यात तहसिलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.