Manorama Khedkar : ब्रेकिंग! पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना जामीन मंजूर…


Manorama Khedkar : वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.

सविस्तर माहिती अशी की, मनोरमा खेडकर यांच्यावर शेतकऱ्यावर पिस्तूल रोखून त्याला धमकावल्याचा आरोप होता. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्या शेतकऱ्याला धमकावताना दिसत आहेत. Manorama Khedkar

दरम्यान, याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज त्यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!