Pooja Khedkar : अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू, धक्कादायक माहिती आली समोर…

Pooja Khedkar : यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला दणका दिला आहे. पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीतच असलेली पूजा खेडकर आता दुबईला पळाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
पूजा खेडकर अटकेच्या भीतीनं दुबईला पळाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिली आणि पुणे पोलीस तिच्या मागावर होते. आता दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे.
पूजा खेडकरचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ती भारतातून थेट परदेशात पसार झाली असावी, अशी शक्यता अनेक वृत्तपत्रांमध्ये व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पूजा खेडकर वरती अनेक आरोप करण्यात आले आहेत. इतर मागासवर्ग प्रवर्गातून पूजाने खेडकरने १२ वेळा UPSC परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर पूजा खेडकरला मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये देखील गैरवर्तन केल्यामुळे तब्बल आठ वेळा मेमो देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेसाठी त्यांचे नाव लिहिताना सातवेळा फेरफार केल्याचं उघडकीस आलं आहे. इतकेच नव्हे तर पूजा खेडकर यांनी वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचे समोर आला आहे.
पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज देखील न्यायालयानं फेटाळला आहे. पूजा खेडकर यांचे एक एक कारनामे समोर येत असल्याने आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.