Sharad Pawar : शरद पवार टाकणार नवीन डाव, अजित पवारांचे टेन्शन वाढलं, पुण्यातून मोठी बातमी आली पुढे…


Sharad Pawar : आगामी काळात म्हणजेच साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. सोनाई उद्योग समुहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रविण माने पुढील चार दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

सोनाई उद्योग समुहाचे संचालक प्रवीण माने हे सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत असून चारच दिवसांत ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत. Sharad Pawar

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इंदापुरात शरद पवार गटाकडून तरुण चेहरा म्हणून प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्याप प्रवीण माने यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही आहे.

अजित पवार यांना मोठा धक्का…

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, त्यापुर्वी पिंपरी-चिंचवडमधील काही माजी नगरसेवकांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला होता. दरम्यान आता प्रणीण माने यांनी जर तुतारी हाती घेतली तर हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!