Gas Cylinder : एका बाजूला योजना अन् एका बाजूला महागाईचा भडका! LPG गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, वाचा नवे दर..


Gas Cylinder : ऑगस्टचा पहिला दिवस दरवाढीचा ठरला आहे. सरकारी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. या बदलानंतर १ ऑगस्टपासून १९ किलोचे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत.

घरगुती वापरासाठी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुमारे ८ ते ९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ कर्मशियल एलपीजी सिलिंडरसाठी करण्यात आली आहे. Gas Cylinder

यावेळीही घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही .NDA सरकारने पहिल्या अर्थसंकल्पानंतर सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरच्या किमती वाढवून मोठा धक्का दिला आहे.

दिल्लीमध्ये १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत ६.५० रुपयांनी वाढली आहे. नवे दर १६५२.५० रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकाता इथे आज १७६४.५० रुपये सिलिंडरची किंमत आहे.

तर मुंबईत १६०५ आणि कोलकाता इथे १८१७ रुपये गॅस सिलिंडरची बदलेली किंमत आहे. यापूर्वी चार महिने कर्मशियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतींत घसरण झाली होती. आता पुन्हा एकदा जुलै महिन्यापासून वाढ करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!