पुण्यात पीएमपीचा फुकट प्रवास करू नका, आता दंडाच्या रकमेत झाली वाढ…!


पुणे : पुण्यात पीएमपीचा फुकट प्रवास करणारांची संख्या जास्त आहे. यामुळे याकडे आता प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे आता दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीएमपीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत फुकट्या प्रवाशांचा दंड 300 वरून 500 रूपये करण्यास मान्यता देण्यात आली होती. यामुळे आता विना तिकीट प्रवास करताना विचार करावा.

यामुळे आता प्रवाशांना विनातिकीट प्रवास केल्यास 500 रूपये दंड पडणार आहे. दरम्यान, याची अंमलबजावणी पीएमपी प्रशासन 10 तारखेपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

असे पीएमपी प्रशासनाने सांगितले. पुण्यात यातून प्रवास करणारांची संख्या मोठी आहे. अनेकदा याठिकाणी बसमध्ये मोठी गर्दी असते. यामुळे गर्दीचा फायदा घेऊन अनेकजण तिकीट काढत नाहीत. यामुळे आता विना तिकीट करणारांना यामुळे चाप बसेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!