Pune News : आली लहर केला कहर!! पुण्यातील टोळक्याला रात्री पिझ्झा खायची लहर, हॉटेलचालकाने नकार दिला अन् घडलं भयंकर…

Pune News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तसेच पुण्यात क्षुल्लक कारणावरून मारहाणी केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
पुण्यात गुन्हेगारांना वर्दीची भीतीच राहिली नसल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच पुण्यात पिझ्झा दिला नाही म्हणून हॉटेल चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. Pune News
पिझ्झा न दिल्याने हॉटेल चालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खराडी परिसरात घडला आहे. ही घटना रविवारी (ता.२८) जुलै रोजी खराडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुअक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेल बंद करुन मालक निघाला होता. त्यानंतर हे चौघे त्या हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी पिझ्झा मागत होते. हॉटेल मालकाने हॉटेल बंद झाल्याचे सांगितले याचा राग मनात धरून थेट हॉटेल मालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.