Pune : ब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवड शहरातील घटना धक्कादायक घटना…


Pune : मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या ऑनलाईन गेममुळे अनेकांचे जीव गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पुन्हा अशीच एक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे.

ब्ल्यू व्हेल या ऑनलाईन गेमच्या नादात एका १५ वर्षाच्या मुलाने चौदा मंजल्याच्या इमारतीवरून उडी मारली. पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिवारातील रुणाल गेटवे सोसायटीत २५ जुलैच्या रात्री ही दुर्देवी घटना घडली आहे.

आर्य श्रीराव (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

श्रीराव हा अत्यंत लाजाळू आणि अभ्यासू मुलागा चिंचवडमधील नामांकित स्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता. मात्र मागील सहा महिन्यापासून तो ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता. ब्लू व्हेल सारखा धोकादायक गेम खेळून तो प्रचंड आक्रमक झाला होता. तो तासनतास स्वतःला आपल्या घरातील खोलीत बंद ठेवून ब्ल्यू व्हेल सारखा ऑनलाईन गेम खेळत होता. कधी- कधी तर तो दोन-तीन दिवस स्वतःला खोलीत बंद ठेवत असायचा.

अतिवृष्टीमुळे २५ जुलैला शाळांना सुट्टी होती, तो ही दिवस आर्यने गेम खेळण्यामध्येच घालवला. मग रात्री घरच्यांनी अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर आला. मात्र, जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीतचमध्येच जाऊन बसला. आई-वडील दुसऱ्या मुलाला ताप आल्याने चिंतेत होते. Pune

रात्रीचा एक वाजला तरी देखील मुलाचा ताप उतरेना, त्यामुळे आई जागीचं होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हॉटसअपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला अन तिला थोडी कुणकुण लागली. मग ती खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा घरात नव्हता, त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली, बघते तर काय? तो तीचाचं मुलगा होता.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या लेकाला पाहून, आईची पायाखालची जमीनचं सरकली. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घरात एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेलं काहीतरी आढळले. मात्र यातून त्याला काय नमूद करायचे होते, याचा शोध आता पिंपरी चिंचवड पोलीस लावत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!