रेल्वे गाडी झाली प्रचारक ! जेनेरीक औषधी दिवस साजरा करण्यासाठी पुणे-दानापुर एक्सप्रेस सजली…! 


पुणे: “प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना” ही भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाची एक प्रमुख योजना आहे. या योजनेतून अत्यंत किफायतशीर दरात दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने या योजनेबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 7 मार्च रोजी जन औषधी दिवस साजरा केला जातो.  या वर्षीचा हा  5 वा जन औषधि दिवस  आहे जो दिनांक 01 ते 07 मार्च या कालावधीत देशाच्या विविध शहरे/नगरांमध्ये “जन औषधी सस्ती भी अच्छी भी” थीम अंतर्गत साजरा केला जात आहे.

गाड़ी  क्रमांक 12149 पुणे-दानापूर एक्स्प्रेसच्या डब्यांना आकर्षक विनाइल रॅपिंग करण्यात आले व या द्वारे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेचे महत्व आणि उद्देश समजवण्यात आले असून पुणे येथून शुक्रवारी रात्री  दानापूरला रवाना करण्यात आली. अशा प्रकारे या योजनेबद्दल जनजागृती आणि प्रचार व ब्रँडिंग उपक्रमास पुणे रेल्वे विभागानेही सहयोग दिला आहे.

देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये 9,000 हून अधिक “प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांद्वारे” 1600 हून अधिक औषधे आणि 200 हून अधिक शस्त्रक्रिया साधने परवडणाऱ्या किमतीत वितरीत केली जातात. या जेनेरिक औषधांची किमत  बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांच्या तुलनेत 50 ते 90 टक्के इतकी कमी आहे. याची  अंमलबजावणी फार्मास्युटिकल्स एंड मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया (पीएमबीआई) च्या माध्यमातून केली जाते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!