Weather Update : आज राज्यात या जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा, मुसळधार पावसाचा हायअलर्ट, जाणून घ्या…


Weather Update : गेल्या आठवड्याभरापासून राज्यामध्ये सर्वत्र ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. हवामान विभाग देखील रोजचा पावसाचा अंदाज देत आहे. जेणेकरून नागरिकांना आधीच काळजी घेऊन खबरदारी घेता येईल.

आता मात्र पावसाचा जोर काहीसा कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तरी आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील घाट माथ्यावर आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर जिल्ह्यातील इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत मात्र आज पावसाचा जोर ओरसणार असल्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये आज हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, ठाण्यात मात्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

कोकणातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Weather Update

कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांतही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांतील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!