बारामतीत आज बजरंग पुनिया , गिता फोगाट यांच्यासारखे मल्ल ! अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान ….


ajit pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 65 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा नेते जय पवार यांच्या पुढाकारातून व बारामती तालूका कुस्तीगीर संघाच्या वतीने रविवारी (दि. २८ जुलै रोजी) भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी अधिक माहिती दिली. बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये दुपारी १ वाजता हे मैदान सुरू होणार आहे या मैदानासाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, गिता फोगट, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख आदी कुस्तीपटू उपस्थित राहणार आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत.

या मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व उपमहाराष्ट्र केसरी माउली कोकाटे यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी माउली जमदाडे व महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख यांची होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व गणेश जगताप यांची होणार आहे. तर चौथ्या क्रमांकाची कुस्ती मुंबई महापौर केसरी भारत मदने व उपमहाराष्ट्र केसरी योगेश जगताप यांची होणार आहे.

या मैदानावर जवळपास शंभर मल्लाच्यात कुस्त्या होणार आहेत. या कुस्ती मैदानावर नॅशनल खेळाडू सोनाली मंडलिक विरुद्ध अमृता पुजारी यांच्यात लढत होणार आहे. या कुस्ती मैदानास महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल उपस्थित राहणार आहेत तरी कुस्तीशौकीनानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!