पुण्यात होळीसाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर, सुरक्षेसाठी हेल्पलाईन नंबर…!

पुणे : होळी हा सर्वांचा आवडता सण आहे. यामुळे तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अनेकांसाठी होळी म्हणजे रंगांची उधळण, पिचकारी आणि पाण्याने भरलेले फुगे एकमेकांना मारने, मजा करणे. पण बऱ्याचदा होळी खेळतान काही महिला छेडखानीला बळी पडतानाच्या घटना समोर येतात.

यामुळे आता पुण्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. होळीला लैंगिक अत्याचार, छळ आणि इतर गुन्ह्यांची तक्रार करणाऱ्या महिलांचे अनेक कॉल येतात. या पार्श्वभुमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेण्यात येईल. होळी पार्टीत सहभागी महिलांच्या सुरक्षिततेसाठी बाउन्सर नियुक्त करणं, या बाबींचा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश आहे.
तसेच, महिलांना त्यांनी छेडछाडीची तक्रार करायची असल्यास किंवा त्यांना असुरक्षित वाटत असल्यास 112 क्रमांकावर कॉल करण्याच आवाहन करण्यात आलं आहे. कॉल जवळच्या पोलिस स्टेशनला निर्देशित केला जाईल आणि तत्काळ कारवाई केली जाईल, असेही पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे. यावर्षी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.”त्यांच्यापैकी तीन ते चार कार्यक्रमस्थळाच्या प्रत्येक विभागात तैनात असतील.
