Sanjay Raut : वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्याने संजय राऊत आक्रमक, फडणवीसांवर साधला निशाणा, नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut : खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, आता फक्त दाऊद इब्राहीमलाच क्लीन चिट द्यायचे बाकी आहे. हे सरकार महाराष्ट्रातील असो किंवा दिल्लीत असो, ओवाळून टाकलेल्या सगळ्यांना आपल्या पक्षात घेत आहे. वायकर घाबरुन पळूनच गेले आहेत, आता त्यांना क्लीन चिट दिली आहे.

हे कायद्याचे राज्य आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला. अशा पद्धतीने त्यांनी खोटे गुन्हे दाखल करुन त्यांनी लोकांना आपल्याकडे घेतले आहे. आमच्याकडे असणारे मंत्रीही पळून गेले आहेत. आता त्यांनी हे खोटे गुन्हे दाखल केले होते हे मान्य केले पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut


आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता का? वायकर सारख्या लोकांचे खटले कसे मागे घेता यावर तुम्ही आता बोलावे, असंही संजय राऊत म्हणाले असे अनेक गुन्हे त्यांनी गैरसमजातून आणि राजकीय दबावातून दाखल केले आहेत. आता ते गुन्हे मागे घ्या. वायकरांना मनस्ताप दिला आहे, त्या अधिका-यांवर आता गुन्हे दाखल केले पाहिजेत, असेही संजय राऊत म्हणाले.