Shirur : शिरूरमध्ये भाजपला मोठा धक्का! सर्व पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे…


Shirur : भाजपा शिरूर शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शिरूरमधील भाजपच्या महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्ष प्रिया बिराजदार व सरचिटणिस शुभांगी पाचर्णे यांच्यासहित १६ महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्याकडे (ता.५) फ निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात पक्षाच्या बैठकीत सुपुर्द केले.

भाजप पक्ष पदाधिकाऱ्यांना कोणतेही सहकार्य करत नाही. वरिष्ठ पदाधिकारी फोन उचलत नाहीत. शासकीय अधिकाऱ्यांशी जनतेच्या कामांसंदर्भात कुठलाही संपर्क करीत नाही. या कारणामुळे शिरूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याचे महिला आघाडी सरचिटणीस शुभांगी पाचर्णे यांनी सांगितले. Shirur

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शहर पदाधिकारी यांनी केलेली कामगिरी कौतुकाची होती. शिरुर तालुक्यातील मताधिक्यापेक्षा शिरूर शहरातील मताधिक्य खासदार अमोल कोल्हे यांना त्या तुलनेत फार कमी झाले आहे.

यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मोलाचे कष्ट केले होते. आता आगामी विधानसभा, जिल्हा परिषद पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत भाजपाचा बुरुज ढासळत असल्याने नवीन बदलाचे संकेत मिळत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!