Pune Crime : महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतलं अन्…; पुण्यातील घटनेने राज्य पोलीस दलात खळबळ


Pune Crime : कोयता गँग, हिट अँड रन प्रकरण यांसारख्या घटनांमुळे आगोदरच बदनाम झालेले पुणे आता आणखी एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आले आहे. पुण्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे.

पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं संपूर्ण पुणेच नव्हेतर अवघा महाराष्ट्र पुरता हादरून गेला आहे. Pune Crime

फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल शुक्रवारी (ता.५) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!