पुणे जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर गुन्हे प्रशिक्षण कर्मचारी पोलिस ठाण्यात नेमावे ; आ. राहुल कुल यांची मागणी…!

उरुळी कांचन : अर्थसंकल्पीय अधिवेशनात दौंड आमदार राहुल कुल यांंनी पुरवणी मागण्यांच्या चर्चेत पोलिस भरती प्रक्रिया ,पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दरातीलपोलिसांना वसाहतीचा प्रश्न सोडविण्यासह जिल्हा स्तरावर सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस ठाण्यांत प्रशिक्षण कर्मचारी नेमावे अशी महत्वपूर्ण मागणी करीत सभागृहाचे लक्ष वेधले आहे.
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पोलिस भरती प्रक्रिया तातडीने करा , राज्य राखीव पोलीस दल व पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा वसाहतींचा प्रश्न सोडवावा पोलिसांच्या कुटूंबियांचा विचार करून आवश्यक निवासी व पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, तसेच ग्रामीण भागातील सायबर गुन्हांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हास्तरावरील सायबर सेलमध्ये प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करावेत आदीं बाबत सूचना केल्या आहेत.
दौंड विधानसभा मतदार संघातील प्रलंबित पाटस पोलीस ठाणे, दौंड व यवत पोलीस ठाणे व उपविभागीय कार्यालयाची नवीन इमारत व पोलीस वसाहतीच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी कुल यांनी केली आहे.