मध्य रेल्वेने ११ महिन्यांत फुकट्यांकडून केला ३ लाखांचा दंड वसूल ! वीस हजारांहून अधिक निघाले फुकटे प्रवासी…!


पुणे : मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाच्या सर्व प्रयत्नांनंतरही पुणे विभागातील गाड्यांमधील तिकीटविरहित प्रवास थांबण्याचे नाव घेत नाही. या गाड्यांमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी नवा विक्रम प्रस्थापित करत आहे.

याचदरम्यान पुणे रेल्वे विभागात फेब्रुवारी महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान 20 हजार 537 लोक बिना तिकीट प्रवास करताना आढळून आले आहेत .त्यांच्यावर कारवाई करत 1 कोटी 73 लाख रुपयांहून जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच 6843 जणांना अनियमित प्रवासासाठी 40 लाख रुपयांहून जास्त दंड ठोठावण्यात आला आहे. याचबरोबर  सामान बुक न करता  घेऊन जाणे . अशा 171 जणांकडून 19 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी एप्रिल ते फेब्रुवारी या 11 महिन्यात 3 लाख 12 हजार 159 प्रकरणामध्ये मध्ये 22 कोटी 52 लाखाहून अधिक दंड स्वरूपात वसूल करण्यात आले आहे.

हि कार्यवाही विभागीय रेल्वे व्यवस्थापक दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकां द्वारे करण्यात आली. विभागाकडून प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भावी होऊ शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!