दहावी बारावीच्या पेपरवेळी शिवाजीनगरमध्ये डीजेचा आवाज, निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर डीजे सुरू…!

पुणे : आज कसबा आणि चिंचवडमध्ये निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला. असे असताना यावेळी विजयानंतर जल्लोष करण्यात आला. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाची घोषणा झाली आहे.
सध्या दहावी, बारावीच्या परिक्षा सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता अंकुश काकडे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून कार्याकत्यांना डिजे व फटाके परीक्षा झाल्यानंतर वाजवावे, असे आवाहन केले आहे.
असे असताना देखील डीजे लावण्यात आला. यामुळे परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला. शिवाजीनगर गावठाण येथे डिजेचा दणदणाट सुरू आहे. डिजेचा आवाज मोठा असल्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळा येत आहे.
दरम्यान, डीजेचा आवाज मोठा असल्याने परीक्षा केंद्रावर अडचण निर्माण झाली. विद्यार्थी पेपर लिहीत होते. यामुळे अनेकांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे.