नवीन समाविष्ट झालेल्या 23 गावांचा होणार विकास, पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय…!


पुणे : पुणे महानगरपालिकेत 23 गावांचा समावेश झाल्यानंतर आता याचा विकास करणे गरजेचे आहे. आता कामकाजावर भार येत असल्याने सेवा प्रवेश नियमावली तसेच आकृतीबंधात 549 नवीन पदाची निर्मिती केली जाणार आहे.

हा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आल आहे. यामुळे विकास कामांना गती मिळणार आहे. सर्व विभागांना किती मनुष्यबळाची गरज आहे, याबाबत सेवक वर्ग विभागांकडून विचारणा करण्यात आली.

यासाठी 1,492 पदांची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात तातडीने आवश्‍यकता असलेले कर्मचारी तसेच त्यांच्या वेतनाचा प्रशासनावर येणारा ताण ही बाब लक्षात घेऊन या पद निर्मितीसाठी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त तसेच लेखापालांची समिती नेमून नेमकी किती पदे भरायची, यावर अहवाल मागवला होता.

दरम्यान, महापालिकेने ग्रामपंचायतीमधील 454 कर्मचारी आधीच सेवेत घेतलेली आहेत. मात्र, अद्याप या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार तसेच पालिकेच्या आकृतीबंधानुसार वेतन, तसेच नियुक्तीचे इतर फायदे देण्यात आलेले नाहीत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!