सहजपूर फाट्याजवळ पंढरपूर एसटी आगाराच्या बसचा अपघात ! चालक गंभीर ३० हून अधिक प्रवासी गंभीर ..!!


 

उरुळीकांचन : पंढरपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी वाहन चालकाचा बसवरचे नियंत्रण सुटून एसटी बस
झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकासह ३० प्रवासी जखमी झाल्याची घटना पुणे -सोलापूर महामार्गावरील सहजपूर (ता.दौंड) फाट्याजवळ घडली आहे.या अपघातात दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Mh40n9519 क्रमांकाची ही एसटी बस असून पंढरपूर एसटी आगाराची ही बस आहे. पंढरपूर हून पुण्याकडे सकाळी सहा वाजता ही एसटी बस निघाली होती. सहजपूर फाट्याजवळ दुपारी बाराच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटून ही बस  झाडावर आदळून अपघात ग्रस्त झाली आहे. एसटीत एकूण ३० प्रवासी असून उरुळीकांचन मधील सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये गंभीर जखमी दोघांना दाखल करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!