Weather Update : कोकण, पुणे, साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता, विदर्भात येलो अलर्ट, जाणून घ्या…


Weather Update : राज्यात काही दिवसांपासून दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या मोसमी पावसाची गती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण, पुणे आणि साताऱ्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

विदर्भासाठी पावसाचा यलो अलर्ट…

तर, विदर्भासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या बऱ्याचशा भागांत पावसाने उसंत घेतली असून विदर्भात मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळशीपार पोहोचले. बुधवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वात उच्चांकी ४१.३ अंश तापमानाची नोंद झाली. तर, भंडारा, चंद्रपूर येथेही उकाडा कायम आहे. Weather Update

या ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यातील काही भागांत आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वारा आणि वीजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!