Pune Crime News : पुण्यात आईसोबत असभ्य वर्तन करणाऱ्याला मारहाण, परस्पर विरोधी गुन्हा दाखल करून तिघे अटकेत…


Pune Crime News : आईसोबत असभ्य वर्तन केल्याच्या कारणावरुन एका युवकाला बेदम मारहाण करुन त्याचे दात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार सोमवारी (ता. १७) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास संचेती हॉस्पिटल चौकात  घडला आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करुन तिघांना अटक केली आहे. रमजान मंगल शेख (वय.३८ रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याने दिलेल्या तक्रारीवरुन किरण कैलास कांबळे (वय. ३१), राहुल ज्ञानेश्वर लोंढे (वय.३१ रा. पाटील इस्टेट) यांच्यावर गुन्हा दाखल करुन राहुल लोंढे याला अटक केली आहे.

आईसोबत असभ्य वर्तन केल्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये रमजान याचे दोन दात पडले. तर किरण कांबळे याने दिलेल्या तक्रारीवरुन रमजान मलंग शेख, रुस्तम मलंग शेख यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. Pune Crime News

दरम्यान, आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच रमजान याने किरणच्या गुडघ्याचा चावा घेऊन लचका तोडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!