Pune Crime : पत्नीच्या गळ्यावर वार करून लॉजच्या रुमला लावले कुलूप, पुण्यात पतीचे धक्कादायक कृत्य…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दररोजन अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना शनिवारी ता.१७) खून करून पती लाॅजला कुलूप लावून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

काजल कृष्णा कदम (वय. २७) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. कृष्णा कदम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, काजल आणि कृष्णा मजुरीचे काम करीत होते. दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला होता. या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते शनिवारी दुपारी भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लाॅजमध्ये गेले. Pune Crime

दोघांनी तेथे मद्यपान केले. नशेमध्ये असताना दोघांमध्ये वाद झाला. कृष्णाने काजलच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केला. या घटनेनंतर खोलीला कुलूप लावून तो फरार झाला.

काही वेळाने त्याने मित्राला पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. मित्राने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन खोलीचे कुलूप तोडले असता काजल मृत अवस्थेत आढळून आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!