Pune : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रश्न मार्गी लावा, मुरलीधर मोहोळ यांच्याकडे योगीराज शिंदे यांची मागणी..


Pune : छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी भाजप सांस्कृतिक आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष योगीराज शिंदे यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.

योगीराज शिंदे म्हणाले की, मोहोळ हे पुणे जिल्ह्यातील असून शेतकरी आहे. आता ते विमानतळ मंत्री असून त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नांना न्याय द्यावा, विमानतळ मुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीच्या जीवनात समृद्धी येणार आहे. Pune

शेतकऱ्यांचा कृषी माल परदेशात जाण्यासाठी मोठी मदत होईल, तसेच उद्योग क्षेत्राला सुद्धा खुप मोठा फायदा होणार आहे , यामुळे दुष्काळी पुरंदर विकसित होण्यास मदत होईल. सुमारे १० ते १५ वर्षे रखडलेले काम आपल्या हातून व्हावे ही सर्व पुणे जिल्ह्यातील जनतेची इच्छा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!