धक्कादायक ! पत्नीला लॉजवर नेऊन केलं अस .. घटनेमुळे पुणे शहर हादरले ..!!
पुणे: मागच्या काही दिवसापासून पुणे शहरात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. सध्या देखील पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात पतीकडून पत्नीला लॉजवर नेऊन चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ भागातील लॉजवर ही घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.या प्रकरणात आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, काजल आणि कृष्णा या पतिपत्नींमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. मात्र या दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला होता. त्यामुळे पती कृष्णा याने काजल हिला बोलण्यासाठी बोलवले होते. मात्र त्यावेळी भलतंच घडलं.
मद्याच्या नशेमध्ये त्यांच्यात पुन्हा मोठा वाद झाला. त्यानंतर कृष्णाने काजलवर चाकूने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर खोलीला कुलूप लावून तो बाहेर निघून गेला. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली असून सध्या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.