Uruli Kanchan : तू माझ्यासोबत रहा, नवऱ्याकडे काय पाहून लग्न केले, असे म्हणत विवाहितेचा विनयभंग! उरुळीकांचन येथील घटना..

Uruli Kanchan : ‘तू माझ्यासोबत कायम रहा,तु तुझ्या नवऱ्यामध्ये काय बघुन लग्न केले आहे.’ असे म्हणत विवाहित महिलेसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मौजे खेडेकरमळा उरूळी कांचन ( ता.हवेली ) मंगळवारी (ता.११) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकणी पिडीत महिलेने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संदेष जाधव (रा.खेडेकर मळा उरूळी कांचन ता.हवेली जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरासमोरील टपरीमध्ये थांबली असता त्यांच्या शेजारी राहणारा संदेष जाधव फिर्यादी यांच्या जवळ जाऊन ‘तू माझ्यासोबत कायम रहा,तु तुझ्या नवऱ्यामध्ये काय बघुन लग्न केले असे म्हणत, फिर्यादीच्या अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न केला. Uruli Kanchan

तसेच तरुणीसोबत अश्लील वर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच आरोपीने त्यावेळी घडलेला प्रकार कोणाला सांगु नको तसेच पोलीसांत तक्रार देवु नको नाहीतर मी तुला मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
