Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील विवाहित महिला बेपत्ता, कोरेगाव मूळ येथे कामाला जाते असे घरी सांगितलं अन्…


Uruli Kanchan : उरुळी कांचन : कोरेगाव मुळ (ता. हवेली) येथे कामाला जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली २९ वर्षीय विवाहित महिला, बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पतीने पत्नी बेपात्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

अनिता गजानन देशमुख( वय २९ रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती गजानन राजाभाऊ देशमुख (वय. ४०, रा. सदर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (ता. ११) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास, सदर महिला कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्द्दीत असलेल्या एका ज्यूस कंपनीत कामाला जाते. असे सांगून निघुन गेली आहे. ती अद्यापपर्यंत घरी आली नाही.

अनिता हि उदय बाळासाहेब शिंदे (रा. तांबेवस्ती, उरूळी कांचन ता. हवेली) यांच्या सोबत गेल्याचा संशय पती गजानन यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, उरुळी कांचन पोलिसांनी पत्नी अनिताचा शोध घ्यावा. अशी विनंती फिर्यादद्वारे पती गजाजन यांनी केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!