Uruli Kanchan : किरकोळ कारणावरुन दोघा भावांकडून एकाला जबर मारहाण, उरुळीकांचन येथील घटना..!!

Uruli Kanchan : उरुळी कांचन : किरकोळ कारणावरून दोन भावांनी एकला जबर मारहाण केल्याची घटना उरुळीकांचन गावाच्या हद्दीत तुपेवस्ती येथे घडली आहे. ही घटना शुक्रवार (ता .७) रोजी मौजे उरुळीकांचन (ता.हवेली) गावाच्या हद्दीत तुपेवस्ती येथे घडली आहे.

याप्रकणी शैलेश प्रसाद शिंदे,(वय.३९ धंदा चालक, रा. तुपेवस्ती उरुळीकांचन ता.हवेली जि पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, विल्यम जाँन जाधव, थाँमस विल्यम जाधव (दोन्ही रा. तुपेवस्ती उरुळीकांचन ता.हवेली जि पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, दोन्ही विल्यम जाधव, थाँमस जाधव हे फिर्यादी यांच्या भावाला शिवीगाळ करत असताना फिर्यादी यांनी त्यांना शिवीगाळ का करता असे म्हणाले असता विल्यम जाँन जाधव यांनी त्यांना हाताने मारहाण करुन ढकलुन दिले. Uruli Kanchan
तसेच थाँमस विल्यम जाधव याने शिवीगाळ करुन हातातील लाकडी काठीने फिर्यादी यांचे उजवे हातावर,पाठीवर,तोंडावर,डावे पायावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दोन भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
