Politics : अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का, ‘हा’ मोठा मंत्री पुन्हा शरद पवारांची साथ देणार? राजकीय घडामोडींना वेग

Politics : निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा माजी मंत्री शरद पवार यांची साथ धरणार असल्याची चर्चा आहे.

वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी ट्विट केलेल्या पोस्टमुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिरूर लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘डॉ अमोल कोल्हे साहेब यांचा दणदणीत विजय; मनःपूर्वक अभिनंदन’, असा मजकुर टाकत त्यांनी सोशल मीडीयावर खासदार कोल्हे यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या विजयी झाल्याबद्दलही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. Politics

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला चांगलं यश मिळालेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी सर्व आमदारांची नुकतीच बैठकही घेतली आहे. या बैठकीला सहा आमदार उपस्थित नव्हते. हे सर्व आमदार त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नव्हते असं अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.
