Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी संपवले आयुष्य, धक्कादायक माहिती आली समोर…
Uruli Kanchan : एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात छताचे लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतून उघडकीस आली आहे. हि घटना तुपे वस्ती परिसरात बुधवारी (ता.५) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
राहुल रावसाहेब जाधव (वय. २५, रा. तुपे वस्ती उरुळी कांचन तालुका हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे .त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याप्रकरणी त्याचा भाऊ रमेश रावसाहेब जाधव (वय. ३७), रा. सदर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, रमेश जाधव यांचा भांडी विक्रीचा व्यावसाय आहे. तसेच त्यांचे बंधू व कुटुंबीयांबरोबर उरुळी कांचन परिसरातील तुपे वस्ती येथे ते राहतात.
बुधवारी दुपारी घरी कोणी नसताना बंधू राहुल जाधव याने राहत्या घरात छताचे लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. Uruli Kanchan
दरम्यान, त्याला नागरिकांच्या व पोलिसांच्या मदतीने खाली उतरवले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहा पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.