Devendra Fadnavis : मला उपमुख्यमंत्रिपदावरुन मुक्त करा!! देवेंद्र फडणवीसांचा मोठा राजकीय निर्णय…


Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीच्या पार्शभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. ४ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये भाजपचे ९ खासदार निवडणून आले आहेत. तर राज्यात काँग्रेसने दमदार पुनरागमन केलं आहे.

स्थानिक उमेदवारांवरील नाराजीचा फटका बसल्याचे फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं. ते पुढे म्हणाले, आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावे अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेले आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातले. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. Devendra Fadnavis

मला सरकारमधून मोकळ करावे, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. किंबहुना आमच्या आपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नरेटिव्हसोबत करावी लागली. त्यामध्ये सविंधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला. हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही. त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, त्याचा आम्हाला फटका बसला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!