Ujani Dam : उजनी धरणात बुडालेले पाच मृतदेह सापडले, नातेवाईकांचा एकच आक्रोश, एकाचा शोध सुरू…


Ujani Dam : उजणी धरणाच्या पात्रात, भीमा नदीत मंगळवारी (ता.२१) संध्याकाळी वाहतूक करणारी बोट उलटली. वादळीवाऱ्याने हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या बोटीमध्ये सात प्रवासी होते. त्यापैकी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आपला जीव वाचवण्यात यश आले.

या बोटीबरोबर सहा जण बुडाले बेपत्ता झाले त्यांना शोधण्यासाठी काल सकाळपासून मोहीम सुरू झाली होती तब्बल ३६ तासानंतर पाच जणांचे मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत.

नेमकं घडलं काय?

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव येथून लॉन्च द्वारे संध्याकाळी सहाच्या दरम्यान इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे निघालेली लॉन्च अचानक वादळी वाऱ्यात सापडली आणि या वादळी वाऱ्यात लॉन्च उलटली.

याच्यामध्ये दोन लहान मुलांसह तब्बल सहा जण बेपत्ता झाले होते, तर एक जण स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे या घटनेत आश्चर्यकारकरीत्या बचावलेले आहेत.

घटना घडल्यापासून लागलीच बचाव करायला सुरुवात झाली मात्र रात्र झाल्यामुळे थांबवली होती काल सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा एनडीआरएफ चे पथक या ठिकाणी बचाव कार्यात सहभागी झाले. ते दिवसभर सहभागी होते.

परंतु काल दिवसभरात काहीही हाती लागले नाही. आज पहाटेच्या वेळी पाच मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. ते पाच मृतदेह एनडीआरएफ चे पथक ताब्यात घेणार असून इतरांचाही शोध सुरू आहे.

दरम्यान घटना घडल्यापासून बेपत्ता झालेल्यांची नातेवाईक करमाळा तालुक्यातील कुगावच्या उजनी पात्राच्या कडेला बसले होते. आज पहाटे आपले आप्तसोकीय पाण्यावर तरंगत आहेत हे पाहून त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी आक्रोश केला. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!