Weather Update : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा! पुढील २४ तास महत्वाचे, जाणून घ्या…

Weather Update : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये येत्या २४ तासात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर आणि दक्षिण कोकणात हा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

रविवारपासून मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. यामुळे प्रचंड उष्णता झेलल्यानंतर राज्याच्या विविध भागांत येत्या २४ तासात मान्सूनपूर्व वारे वाहणार आहे.


भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार आज म्हणजे १० मे रोजी पुण्यासह कोल्हापूर, अहमदनगर, मुंबई, नाशिक, नंदुरबार आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळीवारा व ढगांच्या कडकडाट असा हा पाऊस पडेल. Weather Update
काही ठिकाणी मुसळधार पडेल, काही ठिकाणी तुरळक सरी कोसळतील असा हा अंदाज आहे. तर ११ मे च्या अंदाजानुसार पुन्हा पुण्यासह सातारा, बीड, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
