शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांना खोलीबाहेर काढले , व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, व्हिडीओचा दावा कोणी केला आहे ..!!


 

Loksabha :  लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होत आहे. या दरम्यान सोशल मिडीयावर
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ चांगलाच धमाल करीत असून सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओची चर्चा सुरू आहे.

 

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीबाहेर निघूण जाण्यास सांगितले असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. यामुळे हा व्हिडीओ सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चेत आला आहे.

 

हा व्हिडीओ हा 12 सेकंदाचा असून त्या व्हिडीओमध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितल्याचा दावा भाजप नेते जितेन गजारिया यांनी केला आहे. पण हा व्हिडीओ खोटा असल्याचे देखील अनेकजण बोलत आहेत.

 

 

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शरद पवार एका खोलीमध्ये बसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे त्याठिकाणी नमस्कार करताना दिसतायेत. त्यावेळी शरद पवार यांनी त्यावेळी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे तिथून बाहेर निघून गेले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर अनेक वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!