Pune Crime : धक्कादायक! पुण्यात ११ वर्षीय विद्यार्थीनीशी रिक्षाचालकाकडून अश्लील चाळे, गुन्हा दाखल…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यात शालेय विद्यार्थिनीसोबत रिक्षाचालकाने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकणी आईने विमानतळ पोलिस फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास शिंदे (३५, रा.कलवड, लोहगाव) असे रिक्षाचालक आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, बुधवारी (ता. १) सकाळी सातच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी (११ वर्षे ८ महिने) ही नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी रिक्षाने निघाली. रिक्षा चालकाला संबंधित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असताना देखील त्याने पीडिता रिक्षात एकटी असल्याची संधी साधत एका महाविद्यालयाजवळ रिक्षा थांबवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. Pune Crime

तिचे फोटो काढण्याच्या उद्देशाने गालाला वाईट हेतूने गाल लावून अश्लील चाळे केले. यानंतर रक्षा पुढे नेत चंदननगर येथील साईबाबा कमानीसमोर पीडितेला स्वत:च्या शेजारी बसवत अश्लील स्पर्श करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मेढे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!