Pune Crime : पुण्यात उन्हामुळे दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला, चोरट्यांनी केले धक्कादायक कृत्य, लाखो रुपये…

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी उन्हात दुचाकीवरुन जाणाऱ्या एका कामगाराला चक्कर आली. त्यामुळे त्याची शुद्ध हरपल्याने तो रस्त्याच्या कडेला झाडीत पडला. असे असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडे असलेली 23 लाख 50 हजार रुपयांची बॅग घेऊन पळून गेला. यामुळे मोठी खळबळ उडाली.
याबाबत पोलीस तपास करत आहेत. कात्रज घाटातील हॉलीडे हॉटेलजवळ दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी 35 वर्षीय उद्योजकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस घटना समजून घेऊन तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी याबाबत 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कात्रट घाट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दरम्यान, कंपनीच्या कामासाठी 23 लाख 50 हजार रुपये घेऊन फिर्यादी यांचा कामगार कात्रज घाटातून निघाला होता. Pune Crime


असे असताना कात्रज घाटातील हॉलीडे हॉटेलजवळ असलेल्या वळणावर कामगाराला अचानक चक्कर आली. यामुळे तो शुद्धीवर नव्हता. उन्हामुळे काहीवेळ त्याची शुद्ध हरपल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत झोपला होता. पैशांची बॅक गाडीच्या हँडलला होती.
यावेळी चोरटे आले आणि त्यांनी पैशांची बॅग घेऊन पळून गेले.हा प्रकार लक्षात येताच कामगाराने याची माहिती कंपनीच्या मालकाला दिली. नंतर उद्योजकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्ररा दिली. याबाबत तपास सुरू आहे.